कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील फणसाड वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमा दिवशी प्राणी गणना करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांनी दिली.
वनसंपदेने नटलेल्या,पर्यटनात सुप्रसिद्ध असलेल्या चौपन्न कि.मी.क्षेत्र विस्तार असलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार दि.१२ मे ते मंगळवार दि.१३ मे २०२५ रोजी बुद्ध पोर्णिमा निमित्ताने निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत प्राणिगणना कार्यक्रम घेण्यात आला,सदर गणने मध्ये १३निसर्गप्रेमी तसेच वनक्षेत्रपाल, वनपाल,वनरक्षक, वनमजुर उत्स्फूर्तपणे सहभागी होते.
सदर गणना लपन गृह २,लाकडी ६ मचाणावर निसर्ग प्रेमी प्राणी मित्र बसले होते, यामध्ये विहुर धरण,केतकीची गाण, पॅगोडा,सांबर लोळण,धरणाची गाण,सावराठ तलाव,बांध तलाव,भांडव्याचा माळ,घुण्याचा माळ, चाकाचा माळ,चिखलगाण या ठिकाणी प्राणीगणना करण्यात आली,या उपक्रमात
गणना वेळी प्राण्यांमध्ये रानडुक्कर, सांबर, रानमांजर दिसले त्याचप्रमाणे सरपटणारे प्राण्यांमध्ये हिरवा चोपडा, धीवड आढळून आले.रातवा पक्षाची तीन ठिकाणी अंडी दिसून आली. पक्षांमध्ये रातवा, रानकोंबडा, तिबोटी खंड्या, नवरंग, लहान निळा खंड्या, राखी कोतवाल, राखी धनेश, श्यामा, रानपिंगळा, सातभाई, दयाल, स्वर्गीय नर्तक, निळा मासेमार, हळद्या, सुतारपक्षी, घुबड, पानकावळा, बगळे इत्यादी पक्षांचे दर्शन झाले.
वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे, वनपाल ए. ए .पोकळ, किरण मोरे, संतोष पिंगळा, वनरक्षक अरुण पाटील, केरबा खांडेकर, सुनील जाधवर, योगेश गहिरे, प्रदीप शेळके, गोरक्ष भांबरे, शशिकांत आरोटे, अभिजीत पाटील, सूर्यकांत कुरमिले, अधिसंख्य वनमजूर सदानंद नाईक, प्रदीप बागवे या प्राणी गणनेत सहभागी झाले होते.
यावेळी आपला अनुभव कथन करताना प्राणीमित्र गीता परदेशी यांनी सांगितले कि,निसर्गाच्या सानिध्यात रात्रभर वास्तव्य करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. सहसा वन्यजीव अभयारण्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते आणि त्यात रात्री प्रवेश नसतो. त्यामुळे हा अनुभव अतिशय चांगला होता. केतकीची गाण या अतिशय सुंदर ठिकणी आम्हा ३ महिलांना रात्रभर थांबता आलं पक्ष्यांची किलबिल ,आवाज,रात्री रानडुकरांची दोन पिल्लं केतकीच्या गाणीवर पाणी प्यायला आलेली दिसली. फणसाड अभयारण्याचे वनरक्षक भांबरे सर यांचे सहकार्य लाभले. महिलांनी निसर्ग अनुभवासाठी नक्कीच फणसाड वन्यजीव अभयारण्याला भेट द्यावी.असे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या