कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नूतन विद्यालयात महसूल विभागातर्फे तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सदर शिबिरात आधार कार्ड नोंदणी,रेशन कार्ड/ उत्पन्न दाखले / रहिवासी दाखला,जिवंत ७/१२ मोहीम,७/१२ वरील ए.कु.प/अ.पा.क दुरुस्ती,जून बोजे कामी करणे बाबत. (तगाई वगरे),सामाजिक लाभाच्या योजना संजय गांधी निराधार योजना,पी. एम.किसान योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात येऊन महसूल विभागाशी संबंधित दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच सेजल सुदेश घुमकर, अस्लम हलडे,विहूर ग्रामपंचायत उपसरपंच मुसर्रत उलडे, यशवंत पाटील, ज्ञानेश्वर फलेभाई,नांदगाव मंडळ अधिकारी नारायण गोयजी,ग्राम महसूल अधिकारी अरविंद देशमुख,सुदर्शन सावंत, मयूर नाईक उपस्थित होते.
मंडळ सजातील नांदगाव, मजगांव, उसरोली,वेळास्ते,विहूर ग्रामपंचायत हद्दीतील लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या