Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये तळपत्या उन्हाच्या झळा ! उष्णतेमुळे अंगाची लाही लाही

 

कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर)मागील आठवड्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हवामान ढगाळ राहील व उष्णता वाढेल.या इशा-यानुसार आजही तळपत्या उन्हाच्या झळांचा अनुभव मुरुड वासीयांना आला.दुपारच्या वेळेत तर अतीउष्णतेमुळे अक्षरशः अंगाची लाही लाही होत होती.उष्णतेमुळे पर्यटनावर परीणाम झाला असून पर्यटक व नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले असल्याचे चित्र दिसून आले.

     राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

     याच महिन्यात मागील आठवड्यात उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरु मध्ये तापमानात चढ उतार दिसून येत होती. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुरुड मधील तापमान काही अंशाने कमी झालेले पहावयास मिळाले मात्र पुन्हा वातावरण स्वच्छ होऊन कडक सूर्यप्रकाश पडून वातावरण तापायला सुरुवात झाली.आज दुपारपर्यंत मुरुड चांगलेच तापले होते. त्यामुळे मुरुडच्या नागरिकांनी व पर्यटकांनी देखील घरातच बसून राहणे पसंत केले. काही महत्त्वाच्या कामासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे मुरुड शहरात दुसऱ्या दिवशीही क्लायमेट लाॅकडाऊन पाहावयास मिळाले. 

     पोफळीच्या बागांनी बहरलेल्या मुरुड शहाराचे तापमान बाहेरील तापमानाच्या १ ते २ अंशाने जरा कमी असते तरी आजच्या प्रखर उष्णतेमुळे पर्यटक व नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले असल्याचे चित्र दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर