नांदगावच्या अमृतेश्वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी
कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अमृतेश्वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.हया उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे.
यादिवशी अमृतेश्वर मंदीरात प्रभू श्रीराम मुर्तीची विधिवत पूजा अर्चा व अभिषेक करण्यात आला.यावेळी पाली येथील प्रसिद्ध किर्तनकार तृप्ती मराठे यांचे श्रीराम जन्मावर किर्तन झाले. रात्री ८.०० वा.श्रीप्रभु रामचंद्र पालखी सोहळा संपन्न झाला.यावेळी निरकर गुरुजी यांनी आपल्या प्रास्ताविकात अमृतेश्वर मंदिर पंच कमिटीच्या माध्यमातून मंदिरात होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
अमृतेश्वर मंदिर पंचकमिटी अध्यक्ष उमाकांत चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.स्मिता रविंद्र खेडेकर सर्व पंच कमिटी सदस्य यांसह परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या