Type Here to Get Search Results !

समाज कल्याण व आदिवासी सेवक पुरस्कारार्थी एसटी प्रवासापासून वंचित!: प्रा.जयपाल पाटील यांची मागणी


 कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर)रायगड जिल्ह्यातील समाज कल्याण व आदिवासी विकास खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारार्थीना 9 एप्रिल उजाडले तरी मोफत एसटी प्रवासापासून वंचित राहिले असल्याने कार्यालयात अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.अशी मागणी रायगड भूषण प्रा. जयपाल पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे.

     महाराष्ट्र शासनातर्फे समाजातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांसाठी सेवा करणाऱ्या समाजसेवकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण कर्मवीर दादासाहेब गायकवाड व इतर पुरस्कार सामाजिक न्याय खात्यातर्फे दिले जातात त्यांना सेवा करण्यासाठी प्रवासाला एसटी महामंडळात साधी निमा राम शिवशाही महाराष्ट्र राज्य भरात मोफत उपलब्ध असते. रायगड जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त नसल्याने जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून पुरस्कारार्थींची यादी पेण येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात न पाठविल्याने एक एप्रिल पासून ओळखपत्र युतीनी करण्यासाठी रामवाडी येथे यासाठी रायगड जिल्ह्याला सहआयुक्त यांनी पूर्णवेळ द्यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्यायमंत्री यांजकडे यापूर्वीच मी मागणी केली होती.अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील आदिवासी सेवकांची यादी रामवाडी एसटी कार्यालयाच्या रस्त्याच्या पलीकडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे त्यांनीही 9 तारीख आली,तरी यादी पाठविली नाही या दोन्ही खात्याच्या सक्षम अधिकाऱ्यांबद्दल शासनाच्या मंत्रालयातील खात्याचे मंत्री व सचिव यांनी याविषयी जरूर विचार करावा.अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण, आदिवासी सेवक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयपाल पाटील यांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर