श्रीवर्धन-भेंडखोल येथे श्रीहनुमान जन्मोत्सवानिमित्ताने रंगला डबलबारी भजनाचा जंगी सामना !
कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)श्रीक्षेत्र दक्षिण काशी प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर ह्या पावनभूमीत सावित्री सिंधू संगमाच्या तटावर असलेल्या भेंडखोल गावात नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या उत्तर मुखी मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने घेण्यात आलेले डबलबारी सामने भाविकांचे खास आकर्षण ठरले !
भेंडखोल गावाला लाभलेले श्रद्धास्थान नवसाला पावणारा हा उत्तर मुखी मारुती याच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री सिंधुदुर्ग -कणकवली कोरे नरामवाडी येथील श्रीस्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ बुवा रिया मेस्त्री विरुद्ध रत्नागिरी-गुहागर धोपावे येथील कालिका माता प्रासादिक महिला भजन मंडळ बुवा तेजल जाधव यांच्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या डबलबारी सामन्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील सर्व भजन रसिक प्रेमी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यादिवशी पहाटेच्या वेळी ह भ प श्री वामन काका बोडस यांचे मारुतीरायाच्या जन्मोत्सवावरील बहारदार सुश्र्याव्य किर्तन झाले ,त्यांना पेटीची साथ ओमप्रकाश कोलथरकर तर तबल्याची साथ वीरसेन कोलथरकर यांनी दिली.श्रीहनुमान जन्मोत्सव रात्री भेंडखोल भंडारी समाज बांधवांचे ह्यांचे उत्साही भजनी मंडळाने अतिशय सुंदर रित्या कार्यक्रमाचे आयोजन भेंडखोल भंडारी समाजाच्या वतीने अध्यक्ष विराट माधवदास मयेकर उपाध्यक्ष केतन कोलथरकर, प्रणय पुलेकर, सचिव विशाल कोलथरकर खजिनदार सुयोग मयेकर, अंकित, स्वप्निल, प्रथमेश कोलथरकर, केवल चव्हाण, आदित्य पुलेकर,तसेच समाजातील सर्व आजी आणि माजी पदाधिकारी महिला मंडळ अखंड भेंडखोल भंडारी समाज बांधव मिळून अतिशय भक्ती युक्त वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न झाला .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या