अलिबागच्या एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर)अलिबागच्या एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. जयपाल पाटील,एस ओ एस.प्रभारी अधिकारी सुजय बाजपाई, कार्यक्रम समन्वयक रियाज पठाण मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ. जयपाल पाटील यांनी मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा आणि संविधान निर्मितीतील योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी निबंध,वक्तृत्व,चित्रकला व क्विझ स्पर्धा घेण्यात करण्यात आल्या. विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या