जयपाल दगडे पाटील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात गुजरातमध्ये डंका !
कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण तर्फे देशातील सर्व राज्यात आपदा मित्र आणि आपदा मैत्रीण आपत्ती व्यवस्थापनासाठी देशाचे पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरेंद्र मोदी यांनी राबविण्यास सुरुवात केली असून यामध्ये रायगडचा युवक फाउंडेशनचा सदस्य, प्रशिक्षक जयपाल दगडे पाटील याची मास्टर ट्रेनर म्हणून 21 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गुजरात राज्य आपत्ती प्रशिक्षण केंद्र वडोदरा येथे करण्यात आली होती, सर्व परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त झाल्याचे दूरध्वनीवरून त्याने कळविण्यात आल्याचा मनस्वी आनंद झाला. असे प्रा.जयपाल पाटील यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व मानवी आपत्तीच्या वेळी केंद्र सरकारच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने आपदा मित्र व आपदा मैत्रिणी यांना प्रशिक्षित केले असून अशांना प्रशिक्षित करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे गुजरात पोलिसांनी वडोदरा येथे हे प्रशिक्षण 10 मार्चपासून 21 दिवसाचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली नाशिक अहिल्यानगर नंदुरबार जळगाव नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली, पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी व पुणे जिल्हाधिकारी आपत्ती प्राधिकरणाने तीन जणांची या प्रशिक्षणास निवड केली होती. त्यामध्ये जयपाल दगडे पाटील याची निवड झाली होती.
जयपाल दगडे पाटील यांनी एनजीओ ची स्थापना करून पुणे जिल्ह्यातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रशिक्षण देणे सुरू केले होते त्यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी आपदामित्र म्हणून निवड केली. माझ्यासारखाच जिल्ह्यात कोठेही आपत्ती आल्यास महाराष्ट्र पोलीस जिल्हा प्रशासनास तत्परतेने मदत करणारा,असा त्याचा पुणे जिल्ह्यात नावलौकिक आहे. आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ.जयपाल पाटील यांनी ६व्या जागतिक आपत्ती परिषदेचा समन्वयक असल्याने डेहराडून उत्तरांचल येथे जयपाल दगडे पाटील यांना प्रशिक्षणाची संधी दिली होती,तेथे त्यांनी उत्तम प्रकारे जागतिक आपत्ती तज्ञांकडून प्रशिक्षण घेतले.
गुजरात मध्ये झालेल्या मास्टर ट्रेनिंग प्रशिक्षणात एनडीआरएफ, गुजरात राज्य आपत्ती दल प्रशिक्षक तज्ञांना त्याची उत्तम प्रकारे अवलोकन प्रात्यक्षिक आवडली,प्रत्येक परीक्षेत त्याने अव्वल नाव कमावले, यावेळी गुजरात पोलीस ट्रेनिंग सेंटर बडोद्याचे पोलीस उपअधीक्षक एस, बी गुजर यांनी मास्टर ट्रेनर प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातून 28, मध्यप्रदेशातून 20, राजस्थान मधून 5 आपदा पदा मित्र सामील झाले होते.
रायगड जिल्ह्यात पोलीस दलामार्फत 25 आपत्ती सुरक्षा प्रशिक्षक तयार केले, त्यातील तुरळक काही मदत करतात तर फक्त ओळखपत्र साठी जमा झाले होते. रायगड जिल्ह्यात माझ्या 811 ग्रामपंचायत मध्ये नागरिकांना आपत्ती सुरक्षाचे धडे देत असून खरी गरज इयत्ता ८ वी ते १५वीच्या युवक- युवतींना असल्याने ८ लाख 50 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यास हक्काचा शिष्य जयपाल दगडे पाटील याच्या रुपाने मला उपलब्ध झाला असून भारतीय सैन्य शिख रेजिमेंट रांची येथे अशाच प्रकारचे प्रगत प्रशिक्षण तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीकांत देसाई यांच्या हाताखाली घेतले आहे, अशाच प्रकारे जिल्हाधिकारी आपत्ती प्राधिकरण पुणे, यांचा आपदा मित्र जयपाल दगडे पाटील यांनी गुजरातमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणा बद्दल त्याचे त्याच्या कुटुंबीयांचे मनस्वी अभिनंदन करतो, जीवन अनमोल आहे त्याची सर्वदा काळजी घ्या असे आम्ही प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सुचवित असतो.असे प्रा.डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या