Type Here to Get Search Results !

समुद्रकिनारी रस्त्यावर झाडावर आलेली नारळे व झाप काढण्यात यावीत : अरविंद गायकर * पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे मुख्याधिका-यांना निवेदन

 

कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) एप्रिल -मे महिना तोंडावर असताना मुरुड जंजिरा पर्यटनात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन समुद्रकिनारी रस्त्यालगत,रस्त्यावर आलेल्या नारळ झाडांवरील झालेली नारळे व झाप पडण्याचा संभाव्य धोका ओळखून नारळ व झाप काढण्यात यावेत.याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

      त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांची वर्दळ हळूहळू सुरू होत आहे त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावरती फिरणाऱ्यांची संख्या जास्त असते.

   समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या बाजूस रस्त्यावर अनेक माडाची झाडे झुकलेली आहेत. रस्त्यावरुन जाताना सर्व माडाची झाडे बरोबर डोक्यावर नारळ झाडाचा पसारा घेवून आहेत. अनेक झाप व नारळ रस्त्यामध्ये पडतात. सुदैवाने कोणतीही हानी आजतागायत झालेली नाही.

  राजपुरी गावामध्ये जो एका व्यक्तीच्या नारळ डोक्यात पडून काही महीन्यापुर्वी मृत्यू झाला आहे, अशी परिस्थिती व्हायला नको म्हणून महोदय आपण हा विषय गांभीर्याने घ्यावा. रस्त्यावर आलेले माड झाडांचे मालकांना नारळाचे झाडे साफ करून त्यावरील झाप, व नारळ काढून घेण्यासंबंधी पत्र निर्गमित करावे.असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  यावेळी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे शैलेश वारेकर, देवेंद्र सतविडकर, दामोदर खैरगांवकर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर