कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) जिल्हा रुग्णालय -अलिबाग व म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विशेष तपासणी व प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तालुक्यातील ६५ दिव्यांगांची शिबिरात तपासणी करण्यात आली.
येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात तालुक्यातील दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना आवश्यक त्या मार्गदर्शनासह प्रमाणपत्रासाठी सहकार्य करण्यात आले.
. यावेळी दिव्यांग संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष साईनाथ पवार, तहसीलदार सचिन खाडे, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव, प्रतिमा फडतरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफु
ल्ल पावसेकर मान्यवर उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजक शाहनावाज शाहिद उकये, विजय लाड, म्हसळा तालुका दिव्यांग अध्यक्ष अब्दुल कवी मासलई,शहर अध्यक्ष,उमेश आंजर्लेकर,सुहेल नाझरी,साहिल उभारे,विश्वजीत सालवकर तसेच ग्रामीण रुग्णालय,सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी
वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या