आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्करोग तपासणी शिबिर
कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या कर्करोग तपासणी मोहिमेअंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅन तर्फे शिबिर घेण्यात आले.यावेळी शिबिरात ७४ जणांची तपासणी करण्यात आली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, ताणतणाव आणि बदललेली दैनंदिन परिस्थिती यामुळे असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले असून कर्करोगाचे प्रमाण हे महिला आणि पुरुष मध्ये आढळून येत आहे.हे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध कार्यक्रम, उपक्रम व आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. ह्याच धर्तीवर आयोजित शिबिरामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग याची तपासणी करण्यात आली. सदरील शिबिरासाठी डॉ. शेखर वानखेडे दंतचिकत्सक व डॉ. भैरवी मालवणकर वैद्यकीय अधिकारी यांच्या टिमने आजुबाजूच्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी केली.
मुरुडच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पायल राठोड,आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गुट्टे ,तालुका आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर व प्रा. आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या