Type Here to Get Search Results !

शैलेश काते यांची भा.ज.पा.च्या मुरुड तालुका अध्यक्षपदी फेर निवड

 शैलेश काते यांची भा.ज.पा.च्या मुरुड तालुका अध्यक्षपदी फेर निवड 

कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) भारतीय जनता पार्टीचे तालुका निहाय संघटक निवडणूक प्रमुख आलाफ मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मुरुडमध्ये 

उदय सबनीस यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.या निवडणूक बैठकीत 

मुरुड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते,वेळास्ते ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शैलेश काते यांची तालुका अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

   भारतीय जनता पार्टी संघटन पर्व प्रक्रिया नुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते, त्या अनुषंगाने भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील व रायगड संघटक सतीश धारप यांच्या मान्यतेने मुरुड तालुका अध्यक्षपदी शैलेश काते यांची फेर निवड करण्यात आली.त्यांच्या या फेर निवड करण्यात आल्याबद्दल क्रीडा सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असून तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद व्यक्त केला.

    भारतीय जनता पक्षाचे गेली २५ वर्षांपासून एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते शैलेश काते यांनी सामान्य कार्यकर्ता पासून पक्षात तालुका चिटणीस, सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी राहून मोलाचे योगदान दिले आहे. ते वेळास्ते ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. भा.ज.पा. च्या विचार धारेचा प्रचार प्रसार करत केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून पक्षसंघटना मजबूत करण्यात आपले मोलाचे योगदान राहिल.असे शैलेश काते यांनी यावेळी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर