Type Here to Get Search Results !

मुरुड जंजिरा किनाऱ्यावर “ब्लू बटन जेलीफिश” चा वावर: पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज

 मुरुड जंजिरा किनाऱ्यावर “ब्लू बटन जेलीफिश” चा वावर: पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज

कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर)मुरुड जंजिरा समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’ (पोरपीटा पोरपीटा) या निळसर रंगाच्या आकर्षक परंतु संवेदनशील समुद्री जीवामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली, तरी या जीवाशी संपर्क साधणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते.यासाठी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागामार्फत या ‘ब्लू बटन जेलीफिश’ विषयी जनजागृती करीत आहे.

ब्लू बटन जेलीफिशविषयी अधिक माहिती:•वैज्ञानिक नाव: पोरपीटा पोरपीटा•प्रकार: खरा जेलीफिश नसून, हायड्रॉझोअन पॉलिप्सच्या वसाहतींचा समूह•आकार व रंग: साधारण २–३ सें.मी. व्यासाचा, निळसर रंगाचा, पारदर्शक पिशवीसारखा दिसतो•वास्तव्य: उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय समुद्रातील पृष्ठभागावर तरंगतो•धोका: आकर्षक दिसतो, पण स्पर्श झाल्यास त्वचेवर खाज, सूज, जळजळ आणि चट्टे निर्माण होतात, यासाठी सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून•किनाऱ्यावर फेरफटका मारताना अशा जेलीफिशपासून सुरक्षित अंतर ठेवा.•चुकून संपर्क झाल्यास, प्रभावित भाग समुद्राच्या पाण्याने ताबडतोब धुवावा.•बर्फाचा शेक द्या आणि लक्षणे तीव्र असतील तर तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या.•मुले आणि पर्यटकांनी विशेषतः खबरदारी घ्यावी, कारण हे जीव फारच आकर्षक वाटतात.पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता अनुभवण्याची संधी मिळते, मात्र त्याचबरोबर काही जीव, जसे की ब्लू बटन जेलीफिश, यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी आणि जागरूकता बाळगणे अत्यावश्यक आहे असे आवाहन अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड मधील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. जावेद खान, प्रा. अल्ताफ फकीर व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर