कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात सन. २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठाची पदवी व पदयुत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
वसंतराव नाईक महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाष महाडिक,वासंती उमरोटकर,माजी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, ॲड.इस्माईल घोले, प्राचार्य डॉ. जे. के कांबळे, परीक्षा प्रमुख डॉ. सुभाष म्हात्रे,प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.नारायण बागुल, डॉ.सीमा नाहीद, प्रा.प्रणव बागवे, प्रा. चिंतन पोतदार, प्रा.सिद्धेश सतविडकर, प्रा, मुस्कन रजब, संदेश दांडेकर, मूहित हसवारे अच्युत पोतदार, हरीचंद्र हवालदार,श्रीकांत पालशेतकर,अनघा विरकुड, माजी विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे करण्यात येऊन महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
बॅ.ए.आर.अंतुले यांनी गरिबीचे चटके सोसले होते, दुर्गम डोंगराळ भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे येथे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने मुरुड आणि म्हसळा येथे महाविद्यालय सुरू केली आहेत.असे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
बॅ. अंतुले यांनी महाविद्यालय सुरू करून मुरुड तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण आपल्याच तालुक्यात अतिशय कमी खर्चात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आज हजारो विद्यार्थी पदवी घेऊन नोकरी निमित्ताने बाहेर पडले आहेत.असे माजी प्राचार्य डॉ विश्वास चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले तर
परिस्थितीवर मात करावयाची असेल तर शिक्षण महत्वाचे साधन असून शिक्षणामुळे आज बऱ्याच लोकांची परिस्थिती बदलेली आहे.म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये प्रगती केली पाहिजे.असे वासंती उमरोटकर यांनी सांगितले.या पदवीदान सोहळ्यात १५० विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप करण्यात आले.सुत्रसंचालन डॉ मुरलीधर गायकवाड यांनी केले तर विभाग प्रमुख डॉ.सुभाष म्हात्रे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या