
कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील मौजे कामत वाडीतील खासग खंड १८६ क्षेत्र ४५४३ चौ.मी. या शेतजमिनीत कमळाकर नाम्या गडखळ व बुधाबाई कमळाकर गडखळ या दळी जमिनीवर धनदांडगे जे.सी.बी.च्या साहयाने अवैच उत्खनन करुन नासधूस करीत असून सदर प्रकरणी सखोल चौकशी करून आदिवासी बांधवांना योग्य तो न्याय मिळावा.याबाबत आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद,कायदेशीर सल्लागार ॲड.डॉ.के.डी.पाटील, ॲड.जयेंद्र गुंजाळ ॲड.विक्रांत पाटील ,मार्गदर्शक डॉ.संदीप वारगे यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा खणीकर्म अधिकारी अ.प्र.दिवेकर यांनी निवेदन स्वीकारले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,मौजे कामतवाडी कुईस ता. अलिबाग येथे वनखंड १८६ क्षेत्र ४५४३ चौ.मी. या वर्णनाची कमळाकर नाम्श गडखळ व सुभानाई कमळाकर गडखळ यांच्या नावे व मालकी ताये हक्कात असलेली दळी जमीन आहे. सदर जमीनीवरती गडखळ कुटुंबीय उदरनिर्वाह करीत आहेत सदर जमीन वरील कुटुंबाचा पालनपोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. बन जमिनी अनुसूचित जमाती व अदिवासी समाजाला सरकारने दिलेली महत्वाचा अधिकार व आधार आहे.
असे असताना सदर दळी भागावर जे.सी.बी च्या साहय्याने काही लोक जमिनीची नासधूस करत आहेत व मालकांना न जुमानता उत्खनन करत आहेत सदर कुटुंबाच्या चरित्रासाठी सदर जमीन मिळकत अतिशय महत्वाची आहे सबब मानवाधिकाराचा विचार करुन सदर बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी व गडखळ कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली असून सदर निवेदनाच्या प्रती पोलिस अधीक्षक- रायगड, तहसीलदार, वीज अभियंता- महावितरण अलिबाग यांना देण्यात आल्या आहेत.
आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार ॲड.डॉ.के.डी.पाटील, मार्गदर्शक डॉ.संदीप वारगे,ॲड.विक्रांत पाटील, ॲड.जयेंद्र गुंजाळ ,गणेश कातकरी, सल्लागार संतोष चिंचकर, ॲड.नरेश पाटील,बुधाबाई गडखळ, दिनकर गडखळ, गजानन गडखळ, गंगाराम गडखळ, रोहिदास गडखळ यांसह आदिवासी बांधव व महिला संख्येने यावेळी उपस्थिती होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या