अनिल पुलेकर राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) ठाण्यातील आपली मुंबई न्यूज व निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट आणि अँटी पायरसी सेल ग्राहक दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महाराष्ट्र अभिमान पुरस्कार २०२५” समारंभात रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पुलेकर यांना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
हा पुरस्कार सोहळा दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी ठाण्यातील लोढा अमारा येथील एसी क्लब हाऊसमध्ये उत्साहात संपन्न झाला.यावेळी रणरागिणी ताराराणी फेम अभिनेत्री साक्षी नाईक, कर्नल त्रिपाठी, प्रसिद्ध उद्योगपती आणि मुंबईचे माजी महापौर बाबुभाई भवानजी तसेच मिसेस महाराष्ट्र २०२५ विजेती प्राची जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अनिल पुलेकर यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे आयोजन चंदन पाटील,सुलक्षणा कांबळे, जितू गुप्ता यांनी उत्तम प्रकारे केले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या