मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायती सरपंच पद आरक्षण 23 एप्रिलला सोडत
कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायती निवडणुकीकरिता सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवार,दि.23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वा. पंचायत समिती सभागृह, मुरुड येथील सभागृहात केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी, अलिबाग मुकेश चव्हाण यांनी दिली आहे.
मुरुड तालुक्यातील एकदरा, आगरदांडा, राजपुरी, सावली, खारआंबोली, ना़ंदगाव, वेळास्ते, वावडुंगी, विहूर, उसरोली, तेलवडे, शिघ्रे, तळेखार, मजगांव, मिठेखार,बोर्ली, मांडला, कोर्लई, काशिद, चोरढे, भोईघर,काकळघर, साळाव,वळके या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या