Type Here to Get Search Results !

सर्वे रस्त्याची पार दुरावस्था : दुरुस्ती-डांबरीकरण करण्यात यावे:ग्रामस्थांची मागणी

कोर्लई, ता.३(राजीव नेवासेकर)गेल्या दोन वर्षांपासून मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दितील सर्वे रस्त्याची पार दुरावस्था झालेली असुन हा रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थांतून जोर धरीत आहे.

   अलिबाग-मुरुड रस्त्यावर सर्वे गावात जाणा-या अंदाजे अर्धा कि.मी.रस्त्यावर मागील तसेच यावर्षी पडलेल्या पावसामुळे खाच-खळगे व खड्डे पडल्यामुळे वाहन-चालक व ग्रामस्थांना हाल व त्रास सहन करावे लागत आहेत

     स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून सर्वे रस्त्याची दुरुस्ती-डांबरीकरण लवकरातलवकर करण्यात यावे.अशी मागणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष शिंदे यांनी ग्रामस्थांच्यावतीने कली आहे.

---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर