Type Here to Get Search Results !

मजगांवमध्ये नाती रक्ताची चित्रपटाचा शानदार शुभारंभ

 

मुरुड,ता.१६(नरेश वारगे) भावना प्रधान कौटुंबिक जिव्हाळ्याचा नाती रक्ताची हा लघुपट कोविड 19 वर आपत्ती व्यवस्थापनावर आधारित असून त्या काळातील वस्तुस्थितीचे दर्शन निर्माता दिग्दर्शक आणि कलाकारांनी हुबेहूब रेखाटने असून याला जनता निश्चितच दाद देईल आणि शासनाकडून पुरस्कारही मिळेल.असे प्रतिपादन मुरुड तालुक्यातील मजगांवमध्ये विठ्ठल मंदिर प्रांगणात आयोजित नाती रक्ताची या चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी युवक आणि युवती रसिक कलाकारांना आपल्या मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना गॅस सिलिंडरच्या रबरीनळीचं महत्त्व, व विजय संबंधी दामिनी ॲप ची माहिती दिली.

     तालुक्यातील मजगांवमध्ये विठ्ठल मंदिर प्रांगणात भावना प्रधान कौटुंबिक जिव्हाळ्याचा "नाती रक्ताची"ह्या चित्रपटाचा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील,कवयित्री लेखिका अभिनेत्री विजया कुडव मान्यवरांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आला.यावेळी चित्रपटातील उत्कृष्ट भूमिका व कामगिरी बद्दल कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 .  आगरी समाजाचे अध्यक्ष शरद काबूकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याला तालुका पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत कमाने,माजी उपसरपंच योगेंद्र गोयजी, सागर राऊत,नथुराम तांबडकर,जनार्दन काबूकर,महिला मंडळ अध्यक्षा कल्पना तांबडकर आदी. मान्यवर उपस्थित होते. 

        नाती रक्ताची लघुपटाचे पटकथा लेखक अनंत भोईर, निर्माते रमेश माळी, दिग्दर्शक विजय शेडगे आणि सहदिग्दर्शक जितेंद्र भगत यांनी मान्यवर उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन  दिपप्रज्वलन आणि गणेश पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     यावेळी अनंत भोईर,रमेश माळी,विजय शेडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या तर  जयपाल पाटील व विजया कुडव यांनी  मार्गदर्शनपर विचार मांडले.केले.कौटुंबिक जिव्हाळ्याचा नाती रक्ताची उत्तम निर्मिती समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान ठरेल.असे आगरी समाज अध्यक्ष शरद काबूकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. 

   या चित्रपटाचे लेखक अनंत भोईर, निर्माते रमेश माळी, दिग्दर्शक विजय शेडगे,सहदिग्दर्शक जितेंद्र भगत ,छायाचित्रकार  विनोद तांबडकर,संजीवनी शेडगे यांचा जयपाल पाटील,विजया कुडव यांनी सन्मान केला तसेच यावेळी या चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक स्वप्नील गडदे यांनी केले.शेवटी " नाती रक्ताची " चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट कौटुंबिक, ह्रुदयस्पर्शी आणि आगरी भाषेतील संवाद, वास्तविकता दर्शविणारी गावात साजरे होणारे सण, ऊत्सवाची द्रुष्ये पाहून प्रेक्षकाना हा चित्रपट फारच आवडला आणि प्रेक्षकांनी वाहवा केली आणि निर्माता,लेखक आणि दिग्दर्शकाचे तसेच कलाकारांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर