कोर्लई,ता.३१(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील चिकणी येथे सामाजिक कार्यकर्ते भिकेश दिवेकर यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सन.१८५६च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.
चिकणी येथील भिकेश दिवेकर यांच्या निवासस्थानी सकाळी श्री स्वामी समर्थ यांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली.यावेळी बुवा चंद्रकांत जंगम यांनी पौरोहित्य केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून दुपारी भाविकांसाठी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.मरुड तालुक्यासह आजुबाजूच्या परिसरातील भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या