c
,कोर्लई ता.२६(राजीव नेवासेकर) गेल्या काही महिन्यांपासून मुरुडच्या तहसील कार्यालय इमारतीवर असलेले कौलाचे ढापे धोकादायक असून याठिकाणी माकडांचा उच्छाद असल्याने वेळप्रसंगी हे ढापे पडून दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण?असा सवाल नागरिकांतून विचारला जात असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याठिकाणी तहसील कार्यालय,सेतू, मंडळ अधिकारी, तलाठी, वनविभागाचे कार्यालय, न्यायालय, पोष्ट ऑफिस असल्याने मुरुडसह तालुक्यातील विविध ठिकाणांहून आपल्या कामांसाठी नागरिकांची येथे वर्दळ असते.तहसील कार्यालय इमारतीवरील ढापे धोकादायक स्थितीत आहेत तसेच याठिकाणी माकडांचा उच्छाद असल्याने वेळप्रसंगी हे ढापे पडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या