Type Here to Get Search Results !

मुरुड तालुक्यात जागतिक क्षयरोग दिन व टीबी मुक्त ग्रामपंचायत सत्कार सोहळा

मुरुड तालुक्यात जागतिक क्षयरोग दिन व टीबी मुक्त ग्रामपंचायत सत्कार सोहळा

कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर)मुरुडच्या तहसील कार्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

     तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार संजय तवर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ पायल राठोड यांच्याहस्ते सन.२०२४ मध्ये  तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी टी,बी.मुक्त घोषित करण्यात आलेल्या १३ टी.बी.मुक्त ग्रामपंचायतींचा महात्मा गांधीजींचा पुतळा व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

     यामध्ये सहा ग्रामपंचायतीना सिल्वर व सात ग्रामपंचायत कास्यं पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय समुदाय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी कौतुक केले व असेच चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी संवाद साधताना डॉ. पायल राठोड यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दिनांक ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत राबवण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या कालावधीत जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड यांच्यावतीने पथक मुरुड यांचे काम हे अत्यंत उत्कृष्ट व समाधानकारक असल्याचे सांगितले. मुरुड तालुक्यात 2768 संशयित रुग्णांची थुंकी तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये 23 क्षयरुग्ण सापडले व मुरुड तालुक्यातील ग्रामीण विविध भागात कॅम्प घेऊन साधारण 1024 लोकांचे चेस्ट X- ray करण्यात आले त्यामध्ये 2 क्षयरूग्ण सापडले. व रुग्णांना मोफत उपचार दिला गेला.मागील वर्षी 2023 मध्ये 9 ग्रामपंचायती टी.बी मुक्त घोषित करण्यात आले होते, सन 2025 मध्ये सर्व ग्रामपंचायती टी.बी मुक्त करण्याचे आव्हान तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चुनेकर, प्रास्ताविक वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक संकेत घरत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाघमारे, गणेश शिंदे, शालिकराव पावरा, प्राची चौलकर, मयूर पाटील, नंदकुमार घाडगे,प्रणय धासडे, रसिका ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर