भोईघर ग्रामपंचायतीत शिवणकला प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी -घुंगुर येथील वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून सरपंच हर्षद महाडिक व उपसरपंच प्रसाद चौलकर यांच्या मार्गदर्शनातून महिलांसाठी तीस दिवसांचे शिवणकला प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेचे औचित्य साधून शिवणकला प्रशिक्षणार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.या प्रशिक्षणाचा ४० महिलांनी लाभ घेतला.
ग्रामपंचायत सरपंच हर्षद महाडिक, उपसरपंच प्रसाद चौलकर, सामाजिक कौशल्य विकास संस्था संचालक सुप्रिया पाशिलकर,सदस्य काशिनाथ वाघमारे, अजित महागांवकर, रचना गोपाळे, सुचिता कासार, सोनाली महाडिक, विश्वास गोणबरे, हर्षला वणे, वनिता वाघमारे, ग्रामसेवक संतोष नागोटकर, सचिन बिरवाडकर, नितीन वाघमारे, ग्रामस्थ व महिला यावेळी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या