महिलादिनी आगरदांड्यातील घरकुल लाभार्थींनी मानले शासनाचे आभार !
कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील ४२ गरजू लाभार्थींनी घरकुलाचा लाभ मिळाल्याने महिलादिनी शासनाचे मनस्वी आभार मानले !
आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा - 2 अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ एकूण ४२ लोकांना मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त शासनाचे आदेशानुसार ग्रामपंचायत आगरदांडा हद्दीतील घरकुल योजनेच्या पायाभरणी शुभारंभ घरकुल लाभार्थी च्या पत्नीच्या शुभहस्ते पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक दांडेकर, सरपंच आशिष हेदुलकर,उपसरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व घरकुल लाभार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला सदर प्रसंगी सर्व लाभार्थ्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब राज्य शासन,जिल्ह परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
विस्तार अधिकारी अशोक दांडेकर यांनी असे सांगितले की शासनाने दिलेल्या अनुदान आहे त्या मध्ये लाभार्थ्यांनी मेहनत घेऊन चागलं घर होईल तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काही अनुदान देण्यात येईल शिवाय राज्य शासन या अनुदानामध्ये काही रक्कम वाढवण्याचे प्रयत्न करत आहे परंतु अधिकृत परिपत्रक जाहीर झाले नाही तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले घर बांधण्यासाठी मेहनत घ्यावी
तसेच सरपंच आशिष हेदुलकर,उपसरपंच संतोष पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी देश स्वतंत्र झाल्या पासून ग्रामपंचायत मधील घरकुल योजनेच्या यादीमधील सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या लाभ मिळाला असल्याने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे व जिल्ह्यातील सर्व यंत्रणा व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी याचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच ग्रामीण भागातील महिलांना दिलेल्या घरकुल योजनेच्या लाभामध्ये राज्य शासनाने १.२० हे अनुदान कमी असल्याने ते २.५०पर्यंत मिळाल्यास आमची ग्रामपंचायत हद्दीतील महिला सक्षम होईल.अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी मार्गदर्शन केले तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक दांडेकर तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व उपस्थित घरकुल लाभार्थ्यांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या