Type Here to Get Search Results !

सुरक्षेसाठी महिलांनी घरातील गॅस सिलिंडरची काळजी घ्यावी : प्रा.जयपाल पाटील

 सुरक्षेसाठी महिलांनी घरातील गॅस सिलिंडरची काळजी घ्यावी :  प्रा.जयपाल पाटील

कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर)आपण घरामध्ये दररोजच्या वापरासाठी गॅस सिलेंडरचा वापर करतो, स्वयंपाक घरातील (किचन)च्या ओट्याखाली दाटीवाटीने एक नव्हे दोन सिलेंडर देखील ठेवलेले असतात दररोज रात्री काम झाले कि,आपला गॅस रेग्युलेटरच्या इथून बंद करावा. तशी सवय घरातील इतरांनाही लावावी त्याचबरोबर सिलेंडरला जोडलेली नळीची मुदत केव्हा संपते ती घरातील कॅलेंडरवर नोंदवून ठेवावी व त्याच दिवशी ती नवीन लावावी त्यामुळे गरज आणि आवडीने वापरत असलेल्या गॅस सिलेंडर म्हणजेच बॉम्बची महिलांनी आणि मुलींनी आवश्यक काळजी घ्यावी.असे मार्गदर्शन झिराड ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत प्रा.जयपाल पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायतीच्या प्रशासक प्रार्थना भोईर,मोहन वत्स निवृत्त हवाई दल अधिकारी रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील,शिवाजी जाधव परिमंडळ वनाधिकारी,विष्णू गायकवाड आरसीएफ अग्निशमन अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

      सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून,मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मान्यवरांना शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर प्राध्यापक जयपाल पाटील यांनी संविधान वाचन करण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या झिराड शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान तोंड पाठ असल्याचे कौतुक करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रशासन अधिकारी प्रार्थना भोईर म्हणाल्या कि,जीवनात आपल्या कधी केव्हा आपत्त्या येतील हे सांगता येत नाही यासाठी आपल्या घरातील ही मुले फार महत्त्वाचे असून त्यांना याचे प्रशिक्षण व माहिती असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत हद्दीतील 200 घरात आपत्ती सुरक्षा पोहोचली तर मला आनंद होत आहे. आपल्या प्रास्ताविकात ग्रामविकास अधिकारी सुरेश पाटील यांनी आपत्ती सुरक्षा विषयाचे ज्ञान प्रत्येक नागरिकांस हवे म्हणून आमचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बाष्ठेवाड यांनी प्रा.जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापनतज्ञ यांच्या मार्फत राबविले जात आहे याचा लाभ नागरिकांसोबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना होणार आहे. उपस्थित महिलांना त्यांना बाळंतपणासाठी 102 व तातडीच्या वेळी 108 रुग्णवाहिका जी अपघात प्रसंगी मदत करते यासाठी धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वेटकोळी यांनी वाहन चालक रोहित पाटील यांना 102 रुग्णवाहिका घेऊन पाठविले शाळेत शेजारी आग लागली असता त्याचे प्रात्यक्षिक देताना आरसीएफ स्थळ येथून सतीश हिरो गाडे यांनी विष्णू गायकवाड प्रताप नाईक,रितेश वासकर,अतुल ठाकूर यांनी पोहोचून उपस्थित त्यांना आग विझवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आपल्या गाव शेजारी जंगलात वणवा,आग लागली तर महाराष्ट्र शासनाच्या 1926 या क्रमांकावर फोन करतात.  अलिबाग तालुका वन अधिकारी पाटील यांनी परिमंडळ वन अधिकारी शिवाजी सावंत व त्यांचे सहकारी पंकज घाडी, आणि विशाल पाटील यांनी आग विझवण्याच्या मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महिला मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या 112 क्रमांकावर संपर्क साधतात मांडवा पोलीस ठाणे येथून हवालदार पाटील व त्यांचे सहकारी पोचले. सुरक्षेसाठी असलेले यंत्राची माहिती दिली. यावेळी प्रा.जयपाल पाटील यांनी घरातील गॅस इलेक्ट्रिकल च्या वस्तू साप व विंचू दंशच्या वेळेची काळजी, शेतकरी विमा योजना महाराष्ट्र शासनाचा आपत्ती कायदा त्यातून मिळणाऱ्या मदतीची माहिती यावेळी उपस्थित त्यांना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास रणपिसे आपत्ती सुरक्षा मित्र,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर सर यांनी तर आभार रुचिता कीर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर