Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिना निमित्ताने अदानी फाऊंडेशन दिघी पोर्टतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

जागतिक महिला दिना निमित्ताने अदानी फाऊंडेशन दिघी पोर्टतर्फे मॅरेथॉन स्पर्धा


कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर)महिला म्हणजे संपूर्ण जग, आणि महिला म्हणजेच जागर तुमच्या आमच्या माय लेकींचा , जागर स्त्री जातीचा, आणि विधात्याच्या नव निर्माणाच्या कला कृतीचा. एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा असे भावपूर्ण उद्गार अदानी फाऊंडेशन च्या जयश्री काळे यांनी काढले.

जागतिक महिला दिना निमित्त अदाणी फाऊंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून महिला दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिवेआगर चे प्रथम नागरिक सिद्धेश कोसबे, श्रीवर्धन पोलिस उप अधीक्षक सविता गर्जे,  माळी समाज महिला अध्यक्ष स्नेहल केळसकर, शीतल तोडणकर माजी गट शिक्षणाधिकारी श्रीवर्धन, बचत गट प्रमुख प्राजक्त भगत, बोरली पंचायत सरपंच ज्योती खोत, दिघी पोर्ट लिमिटेड चे चंदर देव संब्याल, गोपाल अहिरकर, संग्राम सिंह शेखावत, जनता शिक्षा संस्था संचालक उदय बापट, अदाणी फाऊंडेशन जयश्री काळे आणि अवधूत पाटील उपस्थित होते. 

   सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन प्रथम श्रीगणेश आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंजू पाटील (सोनी विद्यालय) यांनी केले. 

   सरपंच सिद्धेश कोसबे यांनी जागतिक महिला दिना निमित्त शुभेच्छा देत महिलांच्या विकासासाठी सदैव तत्पर कसे राहता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. शीतल तोडणकर यांनी मॅरेथॉन सामन्यात भाग घेण्यासाठी महिलांना विशेष प्रोत्साहित केले. महिला या कुटुंबासाठी कशा प्रकारे पाठीचा कणा असल्याचे महत्त्व पटवून दिले तर गोपाल अहिरकर (अभियांत्रिकी प्रमुख, दिघी पोर्ट) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या माता जिजाबाई यांनी कशा प्रकारे शिवाजी महाराजांना संस्कार दिले, अगदी तसेच संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना देण्यात यायला पाहिजे असे बोलले. संभाजी महाराज यांनी रयतेची सेवा कशा प्रकारे घडवून आणली आणि यात त्यांच्या आईची भूमिका यावर प्रकाश टाकला.

    दिवेआगर बीच येथे मॅरेथॉन चे उद्घाटन पोलिस उप अधीक्षक सविता गर्जे यांनी झेंडा फडकवत केले. दिवेआगर आणि बोरली येथील १२२ महिला आणि मुलींनी यात सहभाग घेतला. 

  विजेत्या स्पर्धकांना ३ कॅटेगरी १६ ते, २१, २२ते ४० आणि ४० वय वरीलं सर्व  महिला यांचा सहभाग नोंदवण्यात आला. मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस वितरण करण्यात आले. ट्रॉफी तसेच मेडल देऊन गौरवांवित करण्यात आले. मॅरेथॉन मध्ये निरीक्षणाची महत्त्वाची भूमिका वडवली शाळेचे शिक्षक व क्रीडा समीक्षक शेखर बोरकर, मनेरी नानवली शाळेचे मुख्याध्यापक व दिघी केंद्राचे केंद्रप्रमुख परशुराम बिराडी यांनी अथक परिश्रम घेतले.

    अदानी फाऊंडेशन चे अवधूत पाटील, प्राजक्ता अडुळकर, नम्रता दिघीकर, अरुंधती पिळणकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर