मोहन करंदेकर यांची भगत सिंग, राजगुरु, सुखदेव यांना मुरुडमध्ये अनोखी श्रद्धांजली !
क्रांतिकारी भगत सिंग यांचा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.यादिवशी भारतीय संग्रामातील भगत सिंग सुखदेव व राजगुरु या स्वतंत्र्य सैनिकांना ब्रिटिश सामराज्यवादाच्या जोखडातून भारताला मुक्त करण्याचा ध्यास होता. तो त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिला. त्यावेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी सॉडर्स या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झडल्यामुळे या तिघांना २३ मार्च रोजी सायंकाळी फासावर लटकविण्यात आले. या घटनेमुळे दुःखित झालेल्या व भारतीय स्वातंत्र्य लढ्यास स्वताच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या या स्वातंत्र्यविरांचे कार्य बहुमूल्य मानणाऱ्या ज्येष्ठ समाज सेवक मोहन गजानन करंदेकर यांनी हा दिवस वैयक्तिकरित्या साजरा करण्याचे ठरविले.
सन १९८५ साली त्यांनी क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. ठाणे महानगरपालिकेत बांधकाम विभागात काम असताना त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी हां दिवस प्रती वर्षी साजरा केला. निवृत्ती नंतर त्यांच्या मूळगावी मुरुड जंजिरा येथे स्वताच्या निवास स्थानी हा दिवस साजरा करीत आहेत. या दिवशी भगत सिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवसभर निर्जल उपवास ठेवून एक अनोखी श्रद्धांजली करंदेकर अर्पण करत असतात.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील खरा इतिहास सर्वांना समजला पाहिजे. शाळेय पाठ्यपुस्तकात स्वतंत्र विषय असले पाहिजेत त्यामुळे सर्वांना खरा इतिहास समजेल.असे मत करंदेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या