कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील हटाळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लायन्स क्लब ऑफ श्रीबागतर्फे प्रेसिडेंट डॉ.ॲड.के.डी.पाटील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व कापड वाटप करण्यात आले.
निवृत्त माध्यमिक शिक्षक अतुल तुपे,शैलेश घोसाळकर,नांदगांव केंद्रप्रमुख प्राची ठाकूर, मुख्याध्यापिका रश्मी भोपी, सीमा नागावकर, विजया माळी उपस्थित होत्या.यावेळी डॉ.ॲड.के.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शाळेसाठी लवकरच वॉटर फिल्टर देणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संदीप वारगे यांनी तर वैशाली मोहिते यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या