Type Here to Get Search Results !

जिल्हा रुग्णालयात औषध वितरण वेळेत बदल : आदेश देऊनही अंमलबजावणी शून्य ? दिलिप जोग

 जिल्हा रुग्णालयात औषध वितरण वेळेत बदल : आदेश देऊनही अंमलबजावणी शून्य ? दिलिप जोग

कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात औषध वितरण वेळेत बदल होण्याबाबत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आदेश देऊनही कोणती कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिलिप जोग यांनी सांगितले.

    येथील जिल्हा रुग्णालयात औषध वितरणाच्या वेळेत बदल होण्याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी दि.१८ ऑक्टोबर २०२४ ला जिल्हा शल्यचिकित्सक तक्रार केली होती. त्या तक्रारीवर कोणतेही कार्यवाही झाली नसल्यामुळे दि.०६ डिसेंबर २०२४ ला स्मरणपत्र दिले होते.

  त्यावरील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सांनी कार्यवाही केली नसल्याने दिलीप जोग यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करुन याबाबत माहिती मिळविली.

    माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरानुसार तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सांनी दि.१६ जानेवारी २०२५ ला कार्यालयीन आदेश काढून औषध निर्माण अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी यांना लेखी आदेश देऊन कामाचे नियोजन करुन बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण संपेपर्यंत औषध वाटप विभाग सुरु ठेवण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता.

   यानंतर जिल्हा शल्यचिकित्सांची बदली झाली असून बाह्यरुग्ण विभागातील औषधे वितरीत करण्याचे वेळेस आदेश देऊनही बदल करण्यात आलेला नाही.

   जिल्हा शल्यचिकित्सकांचा आदेश न मानणा-या औषध भांडार विभागातील संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आता चर्चा सुरु झाली असून विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक याबाबत कोणती कार्यवाही करतात.याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर