कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्यातर्फे पोलीस व भारतीय सैन्यात १० वी व 12 वी पास असलेल्या मुलींसाठी भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण चार महिने होणार असल्याने त्याचा लाभ आदिवासी मुलींनी घ्यावा असे आवाहन रायगड भूषण, आदिवासी सेवक प्राध्या.जयपाल पाटील यांनी केले आहे.
यासाठी प्रशिक्षण सत्र 1 एप्रिल 2025 पासून यासाठी उंची किमान 150 सेंटीमीटर, वजन किमान 50 किलो ग्रॅम, वय 18 ते 25 वर्ष, शैक्षणिक पात्रता बारावी पास, अनुसूचित जमातीसाठी 10 वी व 12 वीचे मार्क लिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, नाव नोंदणी प्रमाणपत्र, जातीचा दाखला सोबत घेऊन निवडीची प्रक्रिया 25 मार्च 2015 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. प्रशिक्षण कालावधी 4 महिन्याचा असून, प्रशिक्षणार्थी मुलींना भोजन, निवास व गणवेश पुरविण्यात येणार आहे. शिक्षण कालावधीत आधुनिक व्यायाम, ग्रंथालय करिता सामान्य ज्ञान अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलींचे सत्र हे 98 वे असून श्री. अर्पित चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी, तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी दिनांक 17/ 3/ 2025 रोजी जाहीर आवाहन क्रमांक 20 25 पक्र.13 का.2(8)2049 नाशिक असे काढले असून यासाठी मुलींनी केंद्रप्रमुख पोलीस तथा सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आर.टी.ओ जवळ, पेठ रोड नाशिक मोबाईल क्रमांक 800 7980916/9420269023 येथे संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या