Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये भिमराव पांचाळे यांच्याहस्ते योगेश दवटे यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन

 

कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुरुड शाखेतर्फे युवा गझलकार योगेश दवटे यांच्या राधिका या गझलसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे यांचे हस्ते मुरुड नगरपरिषदेच्या शाळा क्र.४ येथे उत्साहात संपन्न झाले. 

     यावेळी अध्यक्षस्थानी को.म.सा.प.रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीरशेठ तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम,मुरुड-श्रीवर्धन नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर,को.म.सा.प.रोहा शाखा अध्यक्षा संध्या दिवकर,ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ.रविंद्र नामजोशी,कवी,निवेदक सुबोध साने,मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ,रायगड जिल्हा युवाशक्तीप्रमुख सिध्देश लखमदे व योगेशचे आई-वडील उपस्थित होते.

सुरुवातीला दिपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व गणेश पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी केले.या गझलसंग्रहाचे प्रकाशन राज्ञा दवटे हिने राधिकेच्या वेशभूषेत एका मडक्यातून गझलसंग्रहाच्या प्रती आणून अनोख्या पध्दतीने करण्यात आले. प्रमुख पाहूणे गझलनवाज भिमराव पांचाळे यांनी गझल कशी सूचते,गझलेला संगीत देण्याची प्रक्रिया कशी घडते हे स्पष्ट करुन योगेशच्या गझलसंग्रहाचे कौतूक केले तसेच त्याची एक गझल सुरमयी स्वरात सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भिमरावांची सुकन्या बागेश्री पांचाळे हिनेही सुंदर गझलांचे गायन करुन कार्यक्रम सांगितिक उंचीवर नेला.प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर यांनी राधिका या गझलसंग्रहाचे रसग्रहण केले.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष सुधीर शेठ,योगेश दवटे,सुबोध साने,प्रसाद चौलकर यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे ओघवते सुत्रसंचालन को.म.सा.प.शाखा तळा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी केले.यावेळी रसिकश्रोते मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर