Type Here to Get Search Results !

लायन्स क्लबतर्फे नवेदरबेलीत मोफत आरोग्य - नेत्र तपासणी शिबिर संपन्न



कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात.समाजामध्ये वावरताना आपण समाजाचे देणे लागतो व समाजसेवा देखील एक व्रत आहे.असे भावपूर्ण उद्गार लायन्स क्लब अलिबाग-नागाव आणि लायन्स क्लब श्रीबाग सेंटीनिअल आयोजित, माधवबाग आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवेदरबेलीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित आरोग्य-नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराप्रसंगी लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष डॉ.ॲड.के.डी.पाटील यांनी काढले.

    यावेळी लायन्सचे फस्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन संजिवजी सुर्यवंशी, रिजन चेअरपरसन MJF लायन विजयजी वनगे, पोयनाड लायन्स क्लबचे वरिष्ठ व नागावचे मार्गदर्शक लायन सिनकर, नागाव क्लबचे अध्यक्ष लायन प्रकाश गुरव, सेटिनिअल श्रीबागचे अध्यक्ष लायन के.डी.पाटील, रिजन चेअरपरसन सचिव लायन संदिप वारगे, नागावचे सेक्रेटरी लायन दिनानाथ पाटील,डायरेक्टर लायन विलास नाईक, मेंबरशिप चेअरपरसन ला. पंढरीनाथ प्रधान, लायन पांडूरंग म्हात्रे,श्रीबाग सेटिनिअलचे लायन सुनिल राणे, लायन विकांत पाटील, लायन जानू शिद, लायन स्मिथ भगत, लायन आईश भगत, लायन संदीप वारगे,लायन सुरेंद्र नागवेकर,लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे डॉ.ऋतुजा बेडेकर, श्रावणी, हिनल थळे, प्रचिती किणी, तर खोपोली येथील माधवबाग हॉस्पिटलचे संपर्क प्रमुख तुषार दिवेकर,डॉ.अभिजित होटकर,तुषार पाटील, आदेश देशमुख, वैजयंता हणुमंते,जय खैरे, प्रांशु मोरया, रा.जि.प. प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश पाटील,मुख्याध्यापिका दिपा फाळके, शिंदे,रुईकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उपस्थित होते.

  सुरुवातीला दिनानाथ पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन शिबिराला सुरुवात करण्यात आली.लायन्स क्लब विविध उपक्रम राबवित असून सामाजिक दायित्व, समाजाचे ऋण लक्षात घेऊन आज नवेदरबेलीत आरोग्य -नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे लायन्स क्लब - नागांवचे अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी सांगितले.यावेळी विजय वनगे,सिनकर, संदीप वारगे, दिनानाथ पाटील,विलास नाईक यांनी आपले विचार मांडले.

     यावेळी माधवबागचे तज्ञ डॉ.अभिजित होटकर व लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या डॉ.ऋतुजा बेडेकर यांच्या टिमने आजुबाजूच्या परिसरातील लोकांची ईसीजी, रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, वजन, हार्ट रेट, (SPO2) ऑक्सीजन तपासणी करण्यात आली.यामध्ये 40 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 34 लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली पैकी 4 मोतिबिंदू 1 रेटीना रुग्ण आढळून आले.लायन्स क्लब हेल्थ फाउंडेशनच्या चोढी येथील दवाखान्यात मोतीबिंदू व रेटिना रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे संदीप वारगे यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर