Type Here to Get Search Results !

नैनिता कर्णिक राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभारत्न नारीगौरव पुरस्काराने सन्मानित

 नैनिता कर्णिक राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभारत्न नारीगौरव पुरस्काराने सन्मानित                     ‌ ‌‌ 

कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)पुण्यातील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्यावतीने मुंबई-दादर येथील सांस्कृतिक सभागृह मागल्य सभागृहात आयोजित सोहळ्यात मुरुड येथील नगरपरिषद शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नैनिता नयन कर्णिक यांना राज्यस्तरीय भारतज्योती नारीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 माजी पोलीस निरीक्षक नंदकुमार सावंत,लेखक‌अभिनेता,डाॅ‌.नंदकुमार सावंत,गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख तथा‌ कीर्तनकार सायली जाधव मान्यवर यावेळी उपस्थित होते.

   सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणपतीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या राज्यस्तरीय भारतज्योती  नारीगौरव पुरस्कार सोहळ्यात मुरूडच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नैनिता नयन कर्णिक यांना शाल, मानपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन.२०२५ चा राज्यस्तरीय भारतज्योती  प्रतिभारत्न नारी गौरव पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार वितरणासाठी त्यांचे पती नयन कर्णिक मुलगा आशुतोष, बहीण नैना कर्णिक (रश्मी देशपांडे) उपस्थित होते.संस्थापक कृष्णाजी जगदाळे यांनी ही संस्था २५ वर्ष  महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.*या संस्थेचा उद्देश पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते हा आहे.यावेळी  राज्यातील ४० महिलांना  भारतज्योती साहित्यरत्न,समाजरत्न, शिक्षिका अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर