मुरुड आगारात प्रवासी राजा दिन : विभाग नियंत्रक दिपक घोडे यांची प्रमुख उपस्थिती
कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुरुड आगारात पेण येथील विभाग नियंत्रक दिपक घोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात आला.
मुरुडच्या पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळ अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर, व्यापारी प्रतिनिधी भावेश शहा, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गौतम भोसले यावेळी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी मुरुड आगाराला नवीन एस.टी.गाड्या व सी.एन.जी पंप बसविण्यात मागणी केली असता रायगड विभागास नवीन गाड्या (बसेस) उपलब्ध होताच तात्काळ मुरुड आगाराला नवीन बसेस देण्यात येतील तसेच या आगारात सी.एन.जी.पंप बसविण्या बाबत मुंबई मध्यवर्ती कार्यालयाला कळविले असल्याचे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी सांगितले.
यावेळी मुरुड जंजिरा पर्यटनात आगाराकडे जाण्यात शहरातील भागात दर्शक फलक लावण्यात यावेत, मुरुड ताम्हाणी मार्गे पुणे सेवा सुरु करावी, उपहारगृह (कॅन्टीन),नवीन गाड्या सुरु करण्यात साळाव पुलाच्या दुरुस्ती नंतर पूलावरुन वाहतुकीत शासनाची १२ टनाची घातलेली अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी अरविंद गायकर यांनी अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याशी संपर्क साधला असता साळाव पूलावरुन १२ टनापेक्षा अधिक वजनाच्या एस.टी.सेवा सुरु करण्यात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी लवकरच चर्चा करून योग्य तो मार्ग काढू असे सांगितले.यावेळी उन्हाळ्यात लातूर व संभाजी नगर सेवा सुरु करण्यात येत असल्याचे गौतम भोसले यांनी सांगितले.
मुरुड मधून व्यापारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात एस.टी.सेवेचा लाभ घेत असतो.या आगारातून चांगल्या प्रकारे सेवा मिळावी.अशी भावना व्यापारी प्रतिनिधी भावेश शहा यांनी व्यक्त केली.मुरुड आगाराचे सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांना निवासासाठी सुविधा यासाठी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात प्रयत्न करणार असल्याचे अरविंद गायकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या