Type Here to Get Search Results !

जंजिरा किल्ल्याच्या नूतन जेटीचे काम अंतिम टप्प्यात : पर्यटकांसाठी दिवाळीत होणार खुली !

मुरुड-जंजिरा,ता.२५(सुधीर नाझरे) मुरुड-जंजिरा पर्यटनात ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील लाखों पर्यटक राजपुरी व खोरा बंदर या जेट्टीवरुन येत असतात.याठिकाणी जंजिरा किल्ल्यात मार्चनंतर समुद्राच्या पाण्याला वेग येतो,बोटी हलायला लागतात त्यामुळे जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते ,अनेकवेळा पर्यटकांना उचलून किल्ल्याच्या पायरीवर उडवावे लागते आणि ते भितीदायक असल्याने शासनाने जंजिरा किल्ल्यात नूतन प्रवाशी जेटी बनवण्याचे ठरवले.यासाठी शासनाकडून ९३ कोटी मंजूर झाले २०२३ ला काम सुरु झाले.होणारी जेटी किल्ल्याच्या मागील बाजूस असल्याने लाटांचा जोर असतो,म्हणून लाटांचा त्रास कमी होण्यासाठी ब्रेक वॉटर बांधण्यात आली .मे २०२४ ला ब्रेक वॉटर पूर्ण झाली .परंतु जानेवारी २०२५ उजाडला तरी जेटीचे पुढील काम सुरु न झाल्याने  नागरिकांमध्ये नाराजी होती .त्यावर मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी माहिती दिली जेटीचे पुढील कामासाठी लागणारे प्लिंथ कॅप आगरदांडा परिसरात बनवण्याचे काम सुरु आहे .ते पूर्ण होताच जंजिरा किल्याची प्रवाशी जेटी एप्रिल महिन्यात पूर्ण होईल आणि मे महिन्यात पर्यटकांसाठी खुली करणायचा मानस होता परंतु समुद्रात काम करताना भरती ओहोटी वेळेत काम करावे लागते म्हणून च काम पूर्ण मे महिन्यात होईल मे महिन्यात समुद्र खवळलेला असल्याने जेटीचा वापर होणार नाही ,पुढील हंगाम म्हणजे दिवाळीत पर्यटक नवीन जेटीने किल्यात जातील.

           १५० मीटर  ब्रेक वॉटर वॉलमुळे समुद्राच्या लाटा अडवल्याजातील आणि प्रवाशी जेटी पूर्णपणे सुरक्षित असेल.पर्यटकांना सहज जेटीवर उतरून किल्ला निवांत पाहता येईल.सुरक्षित व आनंददायी प्रवास होईल. अशी आशा आहे.

     किल्ल्या मागिलबाजूस ही जेटी असल्याने राजपुरीच्या शिडाच्या बोट धारक नाराज आहे ,कारण त्यांना शिडाची बोट किल्यालाला वळसा मारून जेटीवर न्यावी लागणार असल्याने त्यांचे वेळ व कष्ट वाढणार आहे व मुख्य समुद्रातून जावे लागणार असल्याने पर्यटकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने बोलले जाते . म्हणून बोट धारक नूतन जेटी बाबत नाराज आहे .

         जंजिरा आणि पद्मदुर्ग ( कासा ) हे दोन्ही किल्ले पुरातत्व खात्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ठेवा आहे.जेट्टी नसल्यामुळे होडीसोबत छोटी होडी देखिल न्यावी लागते.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरीटाईम बोर्डाचे नियम काटेकोट पणे पाळले जातात .जेटी लवकर झाल्यास बोट धारकांचे त्रास कमी होतील.

   ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी 4 ते 5 लाख पर्यटक देश विदेशातून भेट देतात .

पद्मदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक दृष्ट्या अधिक महत्त्व असले तरी फ्लोटिंग जेट्टीची व्यवस्था उपलब्ध नसल्याने,तुलनेने खुपकमी संख्येने पर्यटक भेट देतात.अशी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची धारणा आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर