कोर्लई,ता.३१(राजीव नेवासेकर)अनंत श्रीविभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्रीस्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दक्षिण रायगड ज़िल्ह्याची हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने सकाळी मुरुडच्या कोटेश्वरीमाता मंदिर ते मुख्य बाजार पेठ अशी भव्य, दिव्य,देखणी व धर्म व संस्कृतीला अनुसरून असणारी मिरवणूक यातील विविध देखावे मुरुडवासीयांचे लक्ष वेधून घेत होते,या देखाव्या मध्ये मुख्य फलक,मोटार सायकलं रॅली, निशाणधारी पुरुष माहिला,ढोलपथक रामपंचायतन विविध देखावे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,झाशीची राणी लक्ष्मीबाई,संत गाडगे महाराज ,अहिल्याबाई होळकर,कोळी नृत्य, भजनीमंडळ,त्यानंतर जगद्गुरू श्रींचा रथ व त्यानंतर भक्तगन अशी शिस्तबद्ध मिरवणूक आकर्षण ठरले!त्यामध्ये आकर्षक वेशभूषेमध्ये आलेले भक्तगण ,भगवेमय झालेले मुरुड शहर, फटाक्यांची चौका चौकामध्ये होत् असलेली आतषबाजी,गुढ्या ,संदेश फलक ,लेझीम पथक व गुरुनामात नाचणारे भक्तगण यानी शहरातील वातावरण उल्हासित झाले होते,शेवटी आकरा वाजता कालभैरव मंदीर येथे जगद्गुरू श्री च्या आरतीने मिरवणुकीची सांगता झाली, यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दक्षिण रायगड निरीक्षक गणेश मोरे,ज़िल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी,दीपक पाटील,ज़िल्हा सचिव महेश येरुणकर,युवा अध्यक्ष भरत थिटे,ज़िल्हा कर्नल चंद्रकांत लोनशीकर, माहिला सेना ज़िल्हा अध्यक्ष अंजली ताई जगताप, मुरुड तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर ,सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या