कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर) मुरुडच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष जयवंत अंबाजी,सचिव विनय मथुरे,संचालक नितीन पाटील मान्यवरांच्या
हस्ते रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचक म्हणून मुरूड मधील सीताराम दिवेकर यांचा तर उपाध्यक्षा दीपाली जोशी , सांस्कृतिक कमिटी सदस्या उषा खोत,ग्रंथपाल उत्कर्षा गुंजाळ यांनी सार्वजनिक वाचनालय संचालिका नैनिता कर्णिक यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय भारतज्योती प्रतिभारत्न नारीगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीफळ,शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
गुढीपाडवा,नवीन वर्षाचे औचित्य साधून सार्वजनिक वाचनालयात संस्कार भारती रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या रांगोळी साठी परीक्षक म्हणून महेंद्र पाटील,अच्युत चव्हाण यांचा देखील सांस्कृतिक कमिटी सदस्य सिद्धेश लखमदे यांच्या हस्ते श्रीफळ,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सीताराम दिवेकर यांनी आपल्या मनोगतात आपण विद्यार्थी दशेपासून आजतागायत वाचनालयात येऊन वाचन करत असल्याचे सांगितले.यावेळी नैनिता कर्णिक यांनी आपला सत्कार केल्याबद्दल धन्यवाद दिले.रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी महेश नागले, द्वितीय क्रमांक तेजल सतविडकर, तृतीय क्रमांक सानिका गणेश म्हात्रे यांना मिळाला विजयी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालय कर्मचारी जयश्री भायदे, स्वप्नील भायदे, विवेक भगत यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या