मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे महाबोधी महाविहार आंदोलनाला समर्थन
कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ (रजि.) तर्फे महाबोधी महाविहार मुक्ती समर्थनार्थ तालुक्यातील समाज बांधवांनी अलकापुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून दत्तवाडी,श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक,आझाद चौक,नगरपरिषद, हुतात्मा चौक, हनुमान मंदिर,दरबार रोड अशी शांतता रॅली काढण्यात येऊन तहसील कार्यालयात तहसीलदार रोहन शिंदे यांना एक निवेदन देण्यात आले.
महाबोधी बुध्दगया विहारा संबंधी १९४९ च्या अधिनियमात दुरुस्ती करुन व्यवस्थापनाचे नियंत्रण संपूर्ण बौध्दांचेच असण्याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात बिहार राज्यामधील महाबोधी बुध्दविहार या व्यवस्थापन समितीवर चार बौध्द व चार हिंदू अशी समिती असल्याने सदर विहार हे बौध्दांचे असल्याने त्या ठिकाणी संपूर्ण समितीमध्ये आठ बौध्द भिक्खुच असावे. अशी दुरुस्ती करण्यासंबंधी शांततामय रॅली काढून आपणांस निवेदन देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी स्थानिक तालुका समिती अध्यक्ष सुरेश मोरे,सचिव धर्मेश मोरे, उपाध्यक्ष अशोक जाधव, सुधाकर कांबळे, खजिनदार राजेश गायकवाड, सदस्य मंगेश मोरे, गौतमी मोरे, माधुरी शिंदे, माजी तालुका अध्यक्ष नितीन कोंजिरकर, रविंद्र गायकवाड, माजी तालुका सचिव जिविंद्र मोरे,स्मारक समिती अध्यक्ष मनोहर तांबे, शाखा क्र.१चे अध्यक्ष नितीन गायकवाड, सचिव गौतम मोरे,शाखा क्र.२ चे अध्यक्ष नरेंद्र जाधव,सचिव मोनीश तांबे, सदस्य- संजय तांबे,धर्मचंद्र सोरे, शाखा क्र.३ चे अध्यक्ष जनार्दन शिंदे, सचिव प्रकाश जाधव, धर्मेंद्र गायकवाड, अनंता धोत्रे, यशवंत मोरे,सदस्य प्रवीण मोरे, कल्पेश कांबळे, उद्देश पाबरेकर, बाळकृष्ण मोरे, लता शिंदे, जयश्री मोरे,कमल मोरे, निकिता कोंजिरकर,भारती सोरे, रंजना शिंदे,महादेव मोरे,शुभंम खैरे,आलोख सोरे, विनोद पाबरेकर, संजय गायकवाड आरती तांबे ,किसन तांबे ,प्रमोद जाधव ,हरिदास मोरे,नीता जाधव,शरद कालीटकर, हेमलता शिंदे,महेंद्र कासारे,सुमित शिंदे,काशिनाथ बाबरेकर,लक्ष्मण गायकवाड यांसह संस्थेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या