Type Here to Get Search Results !

मोबाईल ॲप प्रणालीद्वारे घरबसल्या होणार ई-केवायसी : दि.३१ मार्च मुदत

 मोबाईल ॲप प्रणालीद्वारे घरबसल्या होणार ई-केवायसी : दि.३१ मार्च मुदत

कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)शासनाच्या रास्त भाव धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत ई-पॉस मशिन सर्व्हरवर अभावी सातत्याने बंद पडत आहेत. एकीकडे धान्य वितरण कार्यालयाकडून ई-केवायसी करण्यासाठी तगादा लावला जात असताना काही वेळा ई-पॉस मशिन बंद असल्याने ई-केवायसी करायचे तरी कसे ?असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर तोड़गा काढण्यासाठी मेरा केवायसी मोबाईल ? ॲप्लिकेशन विकसीत करण्यात आले असून, त्याद्वारे घरबसल्या ई-केवायसी करण्यात येणार आहे.

    शासनाने रेशनधारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे.यासाठी मुदतही देण्यात आली. मात्र,त्या मुदतीत सगळ्याच शिधापत्रिकां धारकांचे ई-केवायसी होण्यात ई-पॉस मशीन बंद पडण्याच्या प्रकाराने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

     रेशनधारकांना ई-केवायसी बंधनकारक केल्याने रेशन दुकानात नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, ई-केवायसी मशिन अनेक दुकानांत बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाने अखेर या समस्येवर तोडगा काढत मोबाईलवर केवायसीसाठी ॲप विकसीत केले असून, ग्राहक घरबसल्या केवायसी करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने २८ फेब्रुवारी रोजी सूचनाही काढली आहे. १ मार्च पासून हे  ॲप कार्यरत झाले असल्याचे असल्याचे कळविण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया सुलभकरण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांनी मेरा-केवायसी मोबाइल ॲप विकसीत केले आहे.

      त्यामुळे लाभार्थी स्वतः त्यांचा मोबाईल मधून केवायसी पूर्ण करू शकणार आहे. सदर मोबाइल प्रणाली राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांच्यासाठी ही योजना आहे. ई-केवायसी नसेल तर मेरा- केवायसी मोबाईल प्रणालीद्वारे ई-केवायसी पूर्ण करू घेण्यात यावी, अशा सूचना मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निखिल तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर