नांदगाव, मजगांव,बोर्ली-मांडला येथे होळीचा सण उत्साहात
कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यासह नांदगाव मजगांव बोर्ली-मांडला येथे होळी पौर्णिमा व धुळवडीचा सण पारंपारिक पद्धतीने साधेपणाने साजरा करण्यात आला.
मजगांव मधील नवापाडा कोळी समाजाच्यावतीने होळी ला आकर्षक रंग रांगोळी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
बोर्ली गावातील होळीला पूर्वपरंपार म्हणजेच गलबतातून मालाचीने आण व्हायची त्या काळातील आहे म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातील बोर्ली गावामध्ये एकूण तीन पाडे आहेत , पण एक गाव एक होईल ही संकल्पना पूर्वपरंपार जपत आलेले आहे महाशिवरात्रीनंतर छोट्या होळ्यांची सुरुवात होते सर्व बाळ गोपाळ अखंड गावभर फिरून लाकडे गोळा करत छोट्या होळ्या साजरा करतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरामागे एक लाकूड व एक नारळ होळीमध्ये अर्पण केला जातो होळीच्या दिवशी सकाळी सर्व कोळी बांधव आपल्या मासेमारी होड्या सजवून बंदरात वाजत गाजत मिरवणूक काढतात. आणि संध्याकाळी प्रत्येक होडीवर असणारा नाखवा - खलाशी वाचत गाजत होळीची आरती करायला जातात, रात्री शुभमुहूर्तावर गाव पाटील समस्त गावकऱ्यांच्या साथीने होळीला चुड देऊन दहन करतात.याठिकाणी होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला.
आजचा होळीचा सण हा कोळी लोकांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे . होळीच्या दिवशी सर्व कोळी बांधव आपल्या बोटींची विधिवत पूजा करून भरतीच्या मुहूर्तावर त्यांची वाजतगाजत समुद्रात मिरवणूक काढण्यात आली होती. संध्याकाळी बोटींचे नाखवा व सर्व खलाशी आपल्या कुटुंबासोबत वाजतगाजत बोटींची आरती करण्यास बंदरावर गेले , तिथे आपल्या बोटींची विधिवत आरती करून बोटीवरील लावलेला एक मनाचा झेंडा होळी मैदानात असलेल्या होळी ला फेरी मारून घरी आणला गेला ,हा झेंडा गुढीपाडव्या पर्यंत घराच्या वर फडकत ठेवला जातोय.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या