शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा : तहसीलदार रोहन शिंदे
कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर) राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्याबाबत महाराष्ट्रशासन कृषि,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,शासन निर्णयानुसार मान्यता देण्यांत आली असून शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.
या योजनमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र, राज्य शासनाद्वारे राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ,पारदर्शक पध्दतीने वेळेवर उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे तसेच शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज,उच्च-गुणवत्तेची कृषि निविष्ठा,विपणन,स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
ॲग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यासाठी राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्रावर (कॉमन सर्व्हीस सेंटर) सुध्दा सुविधा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. त्यानुषंगाने दिनांक 11/03/2025 रोजी दुपारी 4.00 वाजता तहसिल कार्यालयात सर्व ग्राम महसूल अधिकारी यांची बैठक घेण्यांत आली.
सदर बैठकीमध्ये ॲग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यासाठी मुरुड तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्रावर (कॉमन सर्व्हीस सेंटर) गावनिहाय विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना तहसिलदार यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यानूसार दिनांक 17/03/2025 ते 31/03/2025 या कालावधीत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विशेष शिबीरामध्ये सहभाग नोंदवून संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांचेशी संपर्क साधावा आणि नजिकच्या महा ई सेवा केंद्रावर व ग्रामपंचायत कार्यालयात जावून शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करून घ्यावेत त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार होईपर्यंत सर्व महा ई सेवा केंद्रावर (कॉमन सर्व्हीस सेंटर) व ग्रामपंचायत कार्यालयात निरंतर शिबीर सुरु राहणार आहे.याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.असे आवाहन तहसिलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या