मुरुडच्या सार्वजनिक वाचनालयात जागर माय मराठीचा
कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)मुरुडचे सार्वजनिक वाचनालयात कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने जागर माय मराठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संजय गुंजाळ,उपाध्यक्षा उषा खोत, सचिव नैनिता कर्णिक, कार्याध्यक्ष अरूण बागडे, प्रमुख पाहुणे सुबोध साने सार्वजनिक वाचनालय उपाध्यक्षा दिपाली जोशी, सचिव विनय मथुरे, संचालक अच्युत चव्हाण, ग्रंथपाल उत्कर्षा गुंजाळ यांच्याहस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजनाने कुसुमाग्रज,वि.दा.सावकर यांच्या प्रतिभेला हार अर्पण करून ग्रंथ पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे ,उपस्थितांचे गुलाब पुष्प व सुवर्ण चंपक देऊन स्वागत करण्यात आले. दिपाली जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात माय मराठीची महती कथन करुन कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती देऊन शृंगार मराठीचा कविता सादर केली. यावेळी सारा व राघव करंबे या लहान मुलांनी ज्ञानेश्वरी मधील बाराव्या अध्यायातील काही ओव्यांचे उत्तम सादरीकरण केले. यानंतर प्रतिभा जोशीबाईंनी श्री या शब्दाचा अर्थ यावर १९८७ च्या लेखाचे वाचन केले व हा लेख ज्येष्ठ वाचक सीताराम दिवेकर यांनी अंकातून काढून वाचावयास दिला होता. वीरेंद्र भोईनकर, उत्कर्षा गुंजाळ उषा खोत,नैनिता कर्णिक, वासंती उमरोटकर, सुनिता करंबे,आशुतोष कर्णिक, शकुंतला रोटकर यांनी कविता सादर केल्या. प्रतिभा मोहिले यांनी संत रचना सादर केली. संजयजी गुंजाळ यांनी नटसम्राट नाटकातील भागाचे उत्तम सादरीकरण केले.सुबोध(देवदत्त)साने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ने मजसी ने परत मातृभूमीला,सागरा प्राण तळमळला ही कविता सादर केली तसेच कविता कश्या वाचाव्यात यांचे मार्गदर्शन केले. सिद्धेश लखमदे यांनी दोन मराठी गझल सादर केल्या . या कार्यक्रमास ज्येष्ठ वाचक सीताराम दिवेकर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरूड सदस्य सुनील मोहिले, जया ठाकुर, सदस्या मृदुला आबदेव ,वैशाली कासार, उर्मिला नामजोशी, स्पृहा लखमदे,उमा बागडे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल जयश्री भायदे, लेखनिक स्वप्नील भायदे, विवेक भगत यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा युवाशक्ती प्रमुख तथा गझलकार सिद्धेश लखमदे यांनी उत्कृष्ट केले. यावेळी कुसुमाग्रज यांच्या कवितांना उजाळा दिला.मराठी राजभाषा दिन,व मराठा भाषा गौरव दिन याबाबत सरकारबद्दल प्रतिपादन केले.नैनिता कर्णिक यांनी आभारप्रदर्शन केले तसेच धार्मी लखमदे आणि स्वानंदी लखमदे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या