राष्ट्र सेविका समितितर्फे कार्यक्रम : मुरुड,माणगाव,रोहा तालुक्यातील ११६ सेविका सहभागी
कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर)रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील राष्ट्र सेविका समिती ९० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने ९० मिनिटांची ९० सेविकांची शाखा लावणे हा उपक्रम राबविला जात आहे.त्याचाच भाग रविवार दि.२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ ते ६.३० या वेळेत मंगलवाडी या शाळेच्या मैदानावर रोहा तालुक्याने हा उपक्रम माणगाव ,मुरुड, नागोठणा यांच्या सहभागाने उपस्थितीने ११६ सेविकांचा आकडा पार करत ९० मिनिटाची शाखा घेण्यात आली.
यामध्ये प्रशिक्षित शिक्षकांनी गणसमता,व्यायाम योग, निःयुद्ध ,दंड घोष याची तोंड ओळख करून दिली. या सर्व वातावरणात उत्साह निर्माण करण्यासाठी खेळ ,अभिनय गीता बरोबरच घोषणा देत सर्व महिलांनी आणि मुलींनी ही ९० मिनिटाची शाखा उत्साहात संपन्न झाली.दापोली येथील कोकण प्रांत सहनिधीप्रमुख स्मिता आंबेकर यांनी समिती परिचय आणि सध्याच्या काळात शाखा आणि संघटन याची आवश्यकता या विषयावर आपले विचार मांडले.या कार्यक्रमाला रोहा येथील ७०, नागोठणा -७
मुरुड -२७ व माणगाव येथील -१२ अशा एकूण ११६ राष्ट्र सेविका सहभागी झाल्या असल्याची माहिती रोहा तालुका कार्यवाहीका अरुंधती पेंडसे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या