कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा या संस्थेचे कार्यकारीणी व अलिबाग धर्मादाय आयुक्त (रायगड) यांचे विरोधात दि. २८ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते साकीब मुस्ताक गजगे यांनी सुरु केलेलेआमरण उपोषण संस्थेच्या नवीन कार्यकारिणी निवडणूक येत्या जुलै २०२५ अखेर घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याने आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली !
अंजुमन इस्लाम जंजिरा या संस्थेचे कार्यकारिणी व यांची उपकमिटीच्या सर्व पदाधिकारी यांचे राजीनामे घेऊन नवीन निवडणूक जाहीर करणे,अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेचे घटनेनुसार कार्यकारिणीची मुदत ३ वर्ष आहे. परंतु २०१७ पासुन आजतागायत कुठलीही निवडणुक झालेली नाही,सन. २०१७ ते २०२० पर्यंत चा तीन वर्षाचे कालावधीसाठी कोणतीही निवडणुक न घेता व कोणालाही विश्वासात न घेता खोटा चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्त अलिबाग यांना पाठवून त्यांची दिशाभुल केली व नवीन कमिटी स्थापन केली, धर्मादाय आयुक्तांचे दि. २१/०१/२०२१ चे आदेशानुसार सदर कार्यकारिणीने कोणतीही अंमलबजावणी केली नाही,अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुड ही संस्था धार्मिक नसून शैक्षणिक असल्यामुळे वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे वर्ग करता येत नाही. तरी विद्यमान कार्यकारिणीला ही बाब लक्षात का आली नाही ? धर्मादाय आयुक्त अलिबाग यांचे आदेशाप्रमाणे रु २५०००/- पेक्षा जास्त खर्च किंवा व्यवहार करणे असल्यास संबंधित खातेची परवानगी न घेता आजतागायत जे जे अनधिकृत व्यवहार केलेत त्यांची संबंधित विभागामार्फत चौकशी व्हावी.यासाठी संस्थेच्या प्रांगणात सुरू केलेल्या आमरण उपोषणाची
अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेचे सचिव अर्शद नजिरी,रहिम कबले,तौसिफ फत्ते, इमरान मलिक, लियाकत कासकर, हाफिज कबले,इजाज दरोगे यांनी साकीब गजगे यांच्या आमरण उपोषणाची अखेर दखल घेऊन जुलै अखेरपर्यंत कार्यकारिणी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने अखेर यशस्वी सांगता झाली.यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सामाजिक कार्यकर्ते मुअज्जम हसवारे, युसूफ अर्जबेगी,जाहिद फकजी,परवेज खान खानजादे,राहील कडू, इमरान खानजादा,शाकिब शाहबंदरकर, इम्तियाज फहिम,खिजर ढाकम,सुहेल अनवारे,आक्रम कबले,मु्ब्बशिर लालसे,अतिफ उलडे, इकबाल उलडे, जुबेर कुटकी,सईद शिर्सिकर, निसार दखनी, निजामुद्दीन अलहद्दाद, शौकत बाबर, शौकत कादिरी, मुजफ्फर सुर्वे, अफजल सोंडे,सादीक कबले यांनी साकीब गजगे यांची भेट घेऊन आमरण उपोषणाला पाठिंबा दिला होता.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या