मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालय समितीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून अतुलनीय योगदान दिले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीत’ आणि ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ या गीतांनी करण्यात आली. त्यानंतर प्रा. फिरोज शेख यांनी विद्यार्थ्यांसमोर मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची सखोल ओळख निर्माण करण्यास आणि तिच्याविषयी प्रेम वाढविण्यास प्रेरणादायी ठरला. विद्यार्थी रिया तारे, श्रावणी रणदिवे, श्रिया खोत, स्वरांगी धुमाळ, खनसा हवालदार आणि अय्यान पांगारकर उल्लेखनीय सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अल्ताफ फकीर, ग्रंथपाल प्रा. अंजुम दाखवे आणि बिस्मा किल्लेदार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला, त्यात रिया तारे, श्रावणी रणदिवे, श्रिया खोत, स्वरांगी धुमाळ, खनसा हवालदार आणि अय्यान पांगारकर यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या