Type Here to Get Search Results !

RPLरेवदंडा प्रिमियर लिग तर्फे दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत रेवदंड्याचा प्रतिक ११ संघ प्रथम तर एस.बी.स्पोर्टस् संघ द्वितीय !


कोर्लई,ता.5(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे रेवदंडा प्रिमियर लिग तर्फे आयोजित आरपीएल चषक २०२५ या दि.१ फेब्रुवारी व दि.२ फेब्रुवारी या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि.१फेब्रुवारी २०२५ रोजी रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. सर्व प्रथम गणपती बाप्पाच्या प्रतिमेचे पुजन करून त्यानंतर खेळपट्टीवर श्रीफळ वाढवून आर.पी.एल २०२५ चषकाचा शुभारंभ करण्यात आला. उदघाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शरद गोंधळी, सलीम तांडेल,सुहास घोणे,दुशांत झावरे उपस्थित होते. 


या स्पर्धेत साई स्पोर्ट्स, निखिल इलेव्हन, माही इलेव्हन,प्रतिक इलेव्हन,एस बी स्पोर्ट्स,साहिर इलेव्हन,भुमी कॉटेज आणि आराध्या इलेव्हन या ८ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. 

   या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतीक 11 रेवदंडा संघाने 

रु. 22222/- + 14 ( 5 लिटर जेमिनी कॅन ),द्वितीय क्रमांक SB स्पोर्ट्स रेवदंडा ने रु 11111/-. + 28 ( 1 लिटर जेमिनी बॉटल ) मिळविला.

    स्पर्धेत मोठ्या गटात मॅन ऑफ द सिरीज हितेश उंदीर,बेस्ट बॉलर राहुल जमादार,बेस्ट बॅट्समन रुबीयन तांडेल याला तर छोट्या गटात मॅन ऑफ द सिरीज यश भोईर,बेस्ट बॉलर आदित्य बिर्जे(बुमरा),

बेस्ट बॅट्समन प्रथमेश शेलार (मामा),उत्कृष्ट कर्णधार ऋषी वडके,उत्कृष्ट झेल जोहेल उंदीर,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकाश गायकर,उत्कृष्ट यष्टीरक्षक सागर विचारे, षटकरांचा बादशा रुबीयन तांडेल,चौकारांचा बादशा बंटी शेळके ठरला !

       ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे,शरद गोंधळी,बाबू मोरे,संदिप खोत,सलीम तांडेल,सुराराम माळी,सुहास घोणे,राजु नाईक,दुशांत झावरे,निलेश खोत,रमेश वार्डे यांच्या शुभहस्ते दि.२ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. 

      रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलिप उर्फ छोटमशेठभोईर, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष आशिष गोंधळी,अमित म्हात्रे या मान्यवरांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.ॲड. रोहित भोईर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या स्पर्धेला यंदा १२ वर्षे पुर्ण झाली. स्पर्धेचे आयोजक ॲड.रोहित भोईर,तेजस शिंदे,दिपेश पाटिल,सागर विचारे,संकेत जोयशी,मुहिब दिवेकर यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले तर या स्पर्धेला समलोचक म्हणुन प्रितेश पाटिल,रोशन भोईर,नीरज बनिया लाभले होते,गुणलेखनाचे काम नविद मुकादम, बाळकृष्ण दरणे गुरुजी यांनी केले तसेच नितेश बागडेकर,विक्रम सुर्वे, अलनूर पटेल यांनी पंच म्हणून काम पाहिले. 

रेवदंडा विभागातील सर्व नवोदित खेळाडूंना स्वतःच्या अंगी असलेले कौशल्य दाखवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावा. हा यास्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे ॲड.रोहित भोईर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर