कोर्लई पेट्रोलपंप रस्त्यावर गतीरोधक व दर्शक फलक बसवावेत : ग्रामस्थांची मागणी
कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर)साळाव-मुरुड रस्त्यावर कोर्लई पेट्रोलपंप रस्त्यावर संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गतीरोधक बसवावेत.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील व भा.ज.पा.युवा अध्यक्ष प्रशांत भोय यांनी ग्रामस्थांच्यावतीने संबंधित ग्रामपंचायत व पेट्रोलपंप मालकाकडे केली आहे.
मुरुड जंजिरा, काशिद बीच पर्यटनात साळाव - मुरुड रस्त्यावर विशेष करून शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी सातत्याने वाहनांची वर्दळ असते.याठिकाणी यापूर्वी छोटे मोठे अपघात झालेले आहेत.भविष्यात अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बांधकाम खात्याने याठिकाणी गतीरोधक बसवून व दर्शक फलक लावण्यात यावेत.अशी मागणी करण्यात आली आहे.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या