Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय "मायनाक भंडारी चषकावर" NDR वॉरियर्स न्हावे संघाचे वर्चस्व !

 राज्यस्तरीय "मायनाक भंडारी चषकावर" NDR  वॉरियर्स न्हावे संघाचे वर्चस्व !


कोर्लई,ता.१९ (राजीव नेवासेकर) अलिबाग येथील भंडारी बहुउद्देशिय सामाजिक संस्था आयोजित, समस्त भंडारी समाजाच्या सहकार्यातून भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी "मायनाक भंडारी चषक २०२५" ‌"पर्व ४ थे" ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी किहिम येथील राजा शिवछत्रपती क्रीडांगण येथे उत्कृष्टरित्या पार पडल्या.यामध्ये रोहा तालुक्यातील इंडियन वॉरियर्स न्हावे आपले नाव कोरत वर्चस्व गाजवले.

       ‌सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ गुरुवर्य नाना तोडणकर गुरूजी, किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद(पिंट्या)गायकवाड, किहीम ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, सौ.प्रेरणा भाटकर, किहीम ग्रामपंचायत माजी सरपंच आदिक नार्वेकर, काँग्रेस अलिबाग तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, कित्ते भंडारी हितवर्धक मंडळचे उपाध्यक्ष कमलाकर पडवळ, CA संजय राऊत साहेब, रेवदंडा चौल हितवर्धक मंडळचे अध्यक्ष सुरेश खोत,एकनाथ थेरोंडेकर,संदीप खोत, निलेश खोत,अविनाश करळकर,गणेश गुळेकर आदी. मान्यवर उपस्थित होते.

        राज्यस्तरीय "मायनाक भंडारी चषक" क्रिकेट स्पर्धेत सर्व संघांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील ८ संघ तसेच रायगड बाहेरील ४ संघ सहभागी झाले होते. लहू खेडेकर यांच्या NDR वॉरियर्स न्हावे रोहा या संघाने फायनल सामन्यात प्रशांत चिंबुलकर यांच्या रायगड लिफ्ट, अलिबाग या संघावर मात करून प्रथम पारितोषिक पटकावले. रायगड लिफ्ट अलिबाग या संघाला द्वितीय तर संदीप खोत संघमालक असणाऱ्या भंडारी टायगर्स, मुंबई या संघाला तृतीय पारितोषिकावर समाधान मानावे लागले.

        प्रथम क्रमांक १,०१,१११ रोख रक्कम व चषक- NDR वॉरियर्स न्हावे रोहा, द्वितीय क्रमांक ५०,००० रोख रक्कम व चषक- रायगड लिफ्ट, अलिबाग, तृतीय क्रमांक २५,००० रोख रक्कम व चषक - भंडारी टायगर्स, मुंबई, उत्कृष्ट फलंदाज - राहुल पेडणेकर (रायगड लिफ्ट), उत्कृष्ट गोलंदाज - वैभव कांबळी (NDR वॉरियर्स न्हावे रोहा), मालिकावीर - स्वरूप पिळणकर (NDR वॉरियर्स, न्हावे रोहा)

        स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम १,०१,१११/- रूपये थळ मधील एका दानशूर व्यक्तिमत्वाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिले.

द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम ५०,०००/- रूपये भंडारी बहुउद्देशीय संस्थेकडून देण्यात आले..

तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम २५,०००/- रूपये नागाव नगरीचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी दिले.

        स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची आकर्षक चषकं कै. सुप्रिया सतीश किर ह्यांच्या स्मरणार्थ कु. सायली साक्षी संतोष किर यांच्याकडून देण्यात आली. मालिकावीरसाठीचे पारितोषिक 43" LED TV कै. उर्मिला शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ कु. आशिरा आश्विनकुमार पाटील यांच्याकडून देण्यात आले. सर्वोत्कृष्ट फलंदाज , सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर ची चषके व सायकली संस्थेचे अध्यक्ष श्री.दर्शन ज्योती प्रकाश पारकर यांनी दिली.

       समस्त भंडारी समाजातील ज्येष्ठ, तरुण, लहान मोठ्यांनी देणगी स्वरूपात पाठबळ दिल्यानंतर प्रत्यक्ष मैदानातही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. भंडारी समाज एकसंघ रहावा, खेळाडूंना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावें यासाठी आयोजित केलेल्या पर्व चौथे मायनाक भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दर्शन पारकर, सचिव अक्षय गुळेकर, उपाध्यक्ष अश्विनकुमार पाटील, सदस्य विलास आंब्रे, सदस्य सचिन कदम, सदस्या प्रेरणा भाटकर, सदस्य कल्पेश खवणेकर, प्रतिक खवणेकर, किहीम ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, अभिषेक पेडणेकर , मनजित लिडकर, अंकित गुळेकर तसेच किहिमच्या ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर