Type Here to Get Search Results !

गणेश चोडणेकर रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित

 गणेश चोडणेकर रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित

कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते मुरुड तालुका पत्रकार संघाचे सहसचिव गणेश चोडणेकर यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता पुरस्कार शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

     यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, मिलिंद अष्टीवकर, एस.एम.देशमुख माजी अध्यक्ष - भारत रांजणकर,अभय आपटे,विशाल परदेशी, मुरुड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज शेख,मेघराज जाधव, सुधीर नाझरे,संजय करडे आदिं.सह तालुक्यातील सर्व पत्रकार,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   मुरुड तालुका पत्रकार संघाचे सहसचिव गणेश चोडणेकर गेले १४ वर्षापेक्षा जास्त आपल्या पत्रकारिके मधून विविध समस्या व विशेष लेख लिहून मुरुड तालुक्याला न्याय मिळवून देणारे धडाडीचे काम करत असल्याने त्याची ही पोच पावती म्हणून २०१९ वर्षी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा "उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता.पत्रकारिता मध्ये सातत्य राखल्याने रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने २०२५ चार" रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता पुरस्कार "शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आल्याने सर्वंचस्थारावर त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर