तुकाराम पाटील यांची मुरुड तालुका पंचक्रोशी कब्बडी संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड.
कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यात पंचक्रोशी कब्बडी संघटनेची स्थापना होऊन संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम पाटील यांची एकमताने निवड करण्यांत आली.
वाणदे येथील गांवदेवी क्रिडा मंडळातर्फे कुबड्डी सामने आयोजित केले होते.यावेळी पंचक्रोशी कब्बडी संघटना व गावदेवी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला तसेच त्यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मार्फत उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुणे येथील वलेवाडी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुनेत्रा अजित पवार यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, ट्रॉफी व सूट ड्रेस देऊन गौरविण्यात आले.या दोन्ही बाबींचा विचार करून पंचक्रोशी कब्बडी संघटना व गावदेवी क्रीडा मंडळातर्फे उत्कृष्ट खेळाडू सागर दिवेकर यांच्यावतीने तुकाराम पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पंचक्रोशीतील कबड्डी प्रेमी, खेळाडू, ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंत मला जी पदे मिळाली आहेत,ती न मागता मिळालेली असून प्रत्येक पदाला न्याय, वेळ देतो व काम करतो, भविष्यातही माझ्या कडून चांगले कार्य घडो व या संघटनेमार्फत उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी व संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे तुकाराम पाटील यांनी सांगितले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या